Tuesday, 19 June 2018

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल

मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्तिमत्त्व आहे. देशात मुलभूत बदल करायला निघाला हा अवलिया. नोटबंदी करून काहींची चांगलीच जिरविली . आधार व जनधन खाती काढून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर स्किमच्या माध्यमातून खूप लोकांचे चोरीचे धंदे बंद केले. मनरेगा इ योजनेतील मलई खाणाऱ्यांच्या पोटावरच पाय दिला. स्वच्छ भारत सारखे रिकामे उद्योग करून लोकांच्या शेकडो वर्षांच्या सवयी बदलण्याचा घाट घातला. देश-विदेशात फिरून भारताची इभ्रत व पत वाढविण्याचा जीवापाड प्रयत्न करतोय. भ्रष्टाचाराचे शेकडो मार्ग बंद केले. देशहिताचा पण काँग्रेसने १० वर्ष पेंडिंग ठेवलेला जीएसटी धाडसाने लागू केला. यूरियाच्या नीमकोटिंगमुळे कित्येकांच्या काळ्या धंद्यावर पाणी फिरविले. तीन तलाक विरोधी भूमिका घेऊन रूढीवादी मुस्लिमांची नाराजी ओढवून घेतली. गॅस, रेशनिंग इ. मधील भ्रष्टाचार रोखला. विदेश दौऱ्यावर पत्रकारांचा गोतावळा नेत नसल्याने ती मंडळी दात ओठ खाऊन आहेतच. परदेशी पैशावर भारतात कारस्थान करणाऱ्या एनजीओंवर अंकुश लावला. जीएसटीमुळे व्यापारी लोकांच्या बिन पावतीच्या काळ्या धंद्यावर लगाम बसला. ऑनलाइन सात-बारा, ड्रायव्हिंग लायलेन्स, पासपोर्ट इ मधील लाखो दलालांवर बराचसा पायबंद बसविला. कागदपत्रे स्वाक्षांकित करण्याच्या पद्धतीने अनेकांचा कुटिरोद्योग बंद झाला. सराफांवर टॅक्स लावून व आता वाढवून त्यांच्याही धंद्यांवर संक्रांत आणली. मुद्रा योजनेमुळे  छोट्यामोठ्या उद्योगासाठी भांडवल देऊन रोजगारीची व्याख्याच बदलवून ती स्वयंरोजगार  करून तरुणांची मानसिकता चाकरीऐवजी मालकीकडे वळवण्याचा प्रयत्न चालू आहे. स्टार्ट-अप इंडिया, स्टॅन्ड-अप इंडिया इ योजनांनी रोजगार मागणाऱ्यांना रोजगार देणारा बनविण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या परंपरागत मध्यमवर्गीय व छोटे व्यापारी या समर्थकांची पर्वा न करता गरीब व शेतकरी यांच्या हिताचा अर्थसंकल्प बनविला. जमेल तेवढ्या सर्व समाजघटकांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे ही सर्व भ्रष्ट  टोळी  सैरभैर  झाली  आहे. त्यांनी आता समाजात दुही माजविण्यासाठी जातीयवाद सुरू केला आहे. प्रत्येक छोट्यामोठ्या समाजघटकाची छोटीमोठी नाराजी शोधून काढून त्याला हवा देण्याचे प्रयत्न चालू आहे.

दुर्दैवाने ह्या नाराज घटकांचं मतदान कमी असले तरी ही मंडळी ओपिनिअन मेकर्स आहेत. समाजावर प्रभाव पाडणारी आहेत. यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कंपनीच्या कॅंटीनच्या पकौड्यात मीठ जास्त झाल्याबद्दल थेट कंपनीच्या चेअरमनची बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो काही प्रमाणात यशस्वी होतांनाही दिसतोय. कुठेही काही घडले, थोडीशी चुक झाली किंवा एखाद्या भाजपा नेत्याने काही भाषण केले तर मोदींना जबाबदार धरले जात आहे.

याचा परिणाम मोदींची ताकद कमी होणार आहे. कदाचित २०१९ ला सत्ता जाईल सुद्धा. हे मोदींनाही माहीत असेल. पण त्यांनी आपला मार्ग ढळू दिला नाही. त्यांना सर्वांना आवडणारा अर्थसंकल्प सहजपणे आणता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. सत्ता गेली तरी बेहत्तर, देशहिताच्या मार्गावरून ढळायचं नाही हा त्यांचा बाणा दिसतो. जनतेला स्वत: देशासाठी द्यायचे काहीच नाही, जमेल तेवढे फुकटात पदरात पाडून घ्यायचे आहे. तेही याला त्याला दिलेले नको, मलाच पाहिजे, ही प्रवृत्ती आहे. सर्व गोष्टी सरकारनेच केल्या पाहिजे, न केल्यास हे सरकार नालायक असा प्रचार केला जातो.

मित्रांनो, यातून काय घडेल? मोदींचा पराभव होईल. पुन्हा एकदा जुने कडबोळ्याचे सरकार येईल. मिल-बाॅंटकर-खाओ सुरू होईल. परत लक्षावधी कोटींचे भ्रष्टाचार सुरू होतील.

होऊ द्या. मला काय त्याचे असे म्हणत आपण सर्व मुकाटयाने बघत राहू नका. २०२४ ची वाट बघत राहू नका.

मी हे लिहिल्यामुळे मला भक्त म्हणून हिणवले जाईल, याची मला कल्पना आहे. पण मित्रांनो, मी देशहिताच्या दृष्टीने माझ्या भावना लिहिल्या आहेत. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. उगाच येथे भांडू नका.

टीप: फक्त शेअर करण्यापेक्षा कॉपी पेस्ट करा.

Tuesday, 5 June 2018

👉कॉंग्रेस कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे👈

👉कॉंग्रेस कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे👈

BJP ची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी लोकांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त स्वप्न दाखवली. काळा पैसा परत आणायचा त्यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला, आणि त्यापेक्षाही काळा पैसा पुन्हा तयार होणार नाही यासाठीही खूप प्रयत्न केले. पण भरतातल्या चोरांनी बाहेर ठेवलेला पैसे किती आहे, हे त्यांनी जाहीर करायला नको होते.

दुसरे उदाहरण:
स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करणे, हे पंच वार्षिक योजनेचे काम नव्हे. तुम्ही भलेही सगळीकडे कचरा उचलायला माणसे नेमू शकता, सफाई कामगार वाढवू शकता, पण कचरा करणाऱ्यांचे काय? सरकार ची तयारी असली तरी लोकं अजून स्वच्छ भारतासाठी तयार नाहीयेत. लोकांना स्वच्छतेचे महत्व कळतंच नाही, येता जाता रस्त्यावर थुंकू नये, ST मधून खाल्लेल्या केळ्यांची सालं बाहेर टाकू नयेत...या सवयी चुकीच्या आहेत हे त्यांना समजलेले नाही. स्वच्छ भारत अभियान फेल झाले असे म्हणणारे नेहमी रस्त्यावरच्या कचऱ्याचे उदाहरण देतात, पण हा कचरा रोज जनताच तयार करते आणि रस्त्यावर टाकते हे विसरतात.

तिसरे उदाहरण:
वीज पुरवठा
गेली 3 वर्षे आमच्या भागात load shedding झालेले नाही, आणि 24 तास वीजेची आता सर्वांना सवय झाली. पण कोळश्याचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे, आणि काही वीज निर्मिती केंद्रे दुरुस्ती साठी बंद असल्यामुळे काही दिवस काही तास load shedding होणार आहे. पण 24 तास वीजेचे स्वप्न अवघ्या 3 वर्षात पूर्ण झाल्यामुळे लोकांनी 24 तास वीज गृहीत धरली, आणि आता 3 दिवस काही तास वीज नसल्यामुळे लोकं बोंबाबोंब करतायत.
आणि इथेच bjp ने काँग्रेस कडून शिकायला पाहिजे.

काँग्रेस ने काळा पैसा परत आणायचा विचारच केला नाही.
स्वच्छ भारताचीही काही स्वप्नही दाखवली नाहीत. 'गरिबी हटाओ' वगैरे पोकळ विधानं केली, पण गरिबी हटवण्यासाठी आम्ही नक्की काय करणार ते कधीच सांगितले नाही. 24 तास वीजच काय, प्रत्येक गावात वीज न्यायचे आश्वासनही त्यांनी कधीच दिले नाही. Demonetization आणि digital push चे धाडसी निर्णय, आणि त्याबरोबर येणारी risk त्यांनी कधीच उचलली नाही. They always played safe. इतकेच नव्हे, तर डाव्यांनी मीडिया ला हाताशी धरून त्यांनी *Anti Hindu Propaganda* चालू ठेवला, आणि अल्पसंख्यकांना कायमचे भारताच्या उरावर बसवून ठेवले-त्यांना आरक्षण, झटपट बढती, आणि सर्व प्रकारच्या शुल्का मध्ये सूट द्यायचे आमिष दाखवले, आणि कायमचे हतबल करून ठेवले. ह्याच हतबल लोकांचा वापर ते आता पिढ्यानपिढ्या करत रहणार -दुसरे कुठलेही सरकार आले, की ते कसे दलित आणि इतर अल्पसंख्यक समाजा विरुद्ध आहे ते सर्व जगाला बोंबलून सांगतील. शेतीला व शेतक-यांना सक्षम करण्यापेक्षा, शेतकऱ्यांना उठसूट कर्जमाफी करायची सवयही त्यांनीच लावली, जेणेकरून ते सतत हीच मागणी करत राहतील. Nationalism, patriotism, homogeneity या गोष्टीच वाईट आहेत असा propaganda चालवून त्यांनी देशद्रोह्यांना उचलून धरले, आणि सावरकरांसारख्या देशभक्तांना 'mercy petition' सारख्या क्षुल्लक गोष्टीवरून बदनाम केले. मुसलमानांचे मत मिळवण्यासाठी 'हा देश आधी मुसलमानांचा आहे, आणि मग हिंदूंचा' आणि 'राम खरंच होता का? रामायण खरंच घडले का? पुरावा काय?' असे प्रश्न विचारण्या इतपत त्यांची मजल गेली.
त्यांनी जे काही केले, ते सत्तेसाठी केले, देशासाठी नाही. आणि ही खेळी BJP ला अजून समजली नाही. झटपट सुविधा/कर्जमाफी/पैसा/प्रोमोशन ची स्वप्न बघणाऱ्याना देशभक्ती ने जवळ करणे अशक्य आहे. देशभक्ती जाऊ द्या, त्यांच्या कडून 'भारत माता की जय' म्हणवून घेणेही अशक्य आहे.
*आजच्या मतदाराला फसवणूक हवी आहे, सत्य नको.*

आज लोकांची दिशाभुल केली जात आहे. मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदींना जानुन बुजून विरोध केला जातोय. त्यांना खोटे ठरवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मोदींचे ही कोठेतरी चुकलेच म्हणावे त्यांनी धाडसी निर्णय जरुर घेतले पण नोकरशाहीवर ठेवलेला विश्वास नडला आणि त्या निर्णयांची अंमलबजावणीच निष्फल झाली.

शेवटी इतकेच सांगु इच्छितो की
*विकास वेडा होऊ शकतो पण वेड्यांचा विकास होऊ शकत नाही...*

Source Whatsapp

शेवटची विनवणी...

*शेवटची विनवणी..…*
साभार : - श्रीपाद कोठे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात- डॉ. हेडगेवार भवनात- दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव चौथाईवाले यांनी बाटली हातावर आडवी केली.

दि. ४ जून १९७३.
रात्रीचे सुमारे ९.३० वाजले होते.
त्याच वेळी बाटलीतील तेल संपले. बाबुराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले- `तेल संपले? ठीक. आता उद्या कोण तेल लावतंय?' कालपुरुषच जणू त्यांच्या मुखाने बोलत होता.
त्यावेळी श्री गुरुजी साधारण तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते.
तरीही अगदी तीन महिने आधीपर्यंत म्हणजे १९७३ च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणे, बैठकी, पत्रलेखन, कार्यक्रम सुरूच होते.
त्यानंतर मात्र त्यांना चालणे फिरणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे महालच्या डॉ. हेडगेवार भवनातील मागच्या बाजूची वरच्या मजल्यावरील खोली हेच त्यांचे विश्व झाले होते.
त्याच ठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटून जात होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत; तसेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका मावशी केळकर यांच्यापासून कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील असंख्य लोक होते. संघ स्वयंसेवकांची तर मोजदादच नाही.
दि. ४ जून १९७३ ला डोक्याला तेल लावून झाल्यावर गुरुजी अंथरुणावर झोपले नाहीत. रात्रभर खुर्चीतच बसून होते. पहिल्यांदाच असे झाले होते. त्रास खूप वाढला होता. श्वास घेणे खूपच जड जात होते. त्यामुळे प्राणवायूचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरे दिवशी दि. ५ जून १९७३ रोजी सकाळी लवकरच त्यांचे स्नान उरकण्यात आले. स्नानानंतर नित्याप्रमाणे संध्या केली.
गुरुजींचे स्वीय सचिव डॉ. आबाजी थत्ते त्यांना प्राणवायू देत होते, तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले- `अरे आबा, आज घंटी वाजणार असे दिसते. त्याची काळजी नाही. परंतु संघ शिक्षा वर्ग चालले आहेत. सर्व प्रवासात आहेत. त्यात व्यत्यय येऊ नये अशी इच्छा आहे.'
जीवनाच्या शेवटच्या घटिकांमध्येही चिंता एकच होती, संघाच्या कामात व्यत्यय येऊ नये.
त्याच दिवशी सकाळी ८.१५ वाजता अटलबिहारी वाजपेयी भेटायला आले. सकाळी स्नानापूर्वी गुरुजींनी हातापायाची नखे काढली. स्नानसंध्या झाल्यावर खुर्चीवर बसले अन कमंडलू उजवीकडे ठेवला.
नेहमी कमंडलू डावीकडे ठेवीत असत. पण त्यावेळी उजवीकडे ठेवला. जणू प्रवासाला निघताना सोयीचे व्हावे म्हणून. दुपारी अगदी घोटभर चहा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी नर्सिंग होममध्ये चलण्याचा आग्रह केला. त्यावर, `उद्या बघू' असे म्हणाले.
दुपार नंतर प्रकृती झपाट्याने घसरू लागली. त्यावेळी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांना नागपूरला बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी मोबाईल तर दूरच, साधे दूरध्वनीही सर्वत्र नव्हते. शिवाय, कोड नंबर फिरवून परगावी फोन लावता येत नसे. ट्रंक कॉल बुक करावा लागे. संघ कार्यालयात असलेल्या एकमेव दूरध्वनीवरून निरोपांची सगळी धावपळ कृष्णराव मोहरील करीत होते.
संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. दम लागण्याचे प्रमाण वाढले होते.
संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली. तेव्हा संघाच्या नित्य प्रार्थनेसाठी जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली. तेव्हा, `आज इथूनच प्रार्थना करायची आहे' असे डॉ. आबाजी थत्ते म्हणाले.
त्यानुसार तिथे उपस्थित सगळ्यांनी तिथेच ध्वज लावून प्रार्थना केली. नेहमीप्रमाणे उभे राहणे शक्यच नव्हते त्यामुळे बसूनच पण स्पष्ट स्वरात गुरुजींनी प्रार्थना म्हटली.
रोजच्याप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता चहा आला. गुरुजींनी चहा घेतला नाही. डॉ. आबाजी थत्ते, बाबुराव चौथाईवाले, विष्णुपंत मुठाळ खोलीतच रेंगाळत होते. त्यांना गुरुजी थोडे रागावले. म्हणाले, चहा घेऊन या. एकेक करून तिघेही चहा घेऊन आले.
आठच्या सुमारास दूरध्वनी आला म्हणून डॉ. थत्ते खाली गेले. गुरुजींना लघुशंका लागली. ते उठू लागले. बाबुराव म्हणाले, भांडे आणतो. उठू नका. पण गुरुजी म्हणाले, स्नानगृहातच घेऊन चल.
लघुशंका झाल्यावर हातपाय धुतले. ११ चुळा भरल्या. जणू काही महाप्रवासासाठी संपूर्ण शुद्धता. स्नानगृहातून बाहेर पडण्यासाठी वळले आणि बाबुरावांच्या कमरेला धरून त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली. विष्णुपंत मुठाळ स्नानगृहाच्या दाराजवळच उभे होते. दोघांनी मिळून त्यांना खोलीत आणून खुर्चीवर बसवले.
डोळे बंद, चलनवलन बंद. श्वास मात्र संथ लयीत सुरु होता. बाबुराव पाय चोळू लागले. आबाजी धावत वर आले. त्यांनी प्राणवायू दिला. डॉक्टरांना दूरध्वनी केले.
प्रथम डॉ. परांजपे पोहोचले. त्यांनी तपासले आणि म्हणाले, `सर्व संपत आले आहे. let him die peacefully.' पाठोपाठ डॉ. पेंडसे, डॉ. वेचलेकर, डॉ. शास्त्री, डॉ. पांडे, डॉ. इंदापवार आले.
संघाचे अधिकारी बाबासाहेब घटाटे, बापूराव वऱ्हाडपांडे, विनायकराव फाटक हेदेखील पोहोचले. सगळे भोवती उभे होते.
श्वास हळूहळू कमी कमी होत होता.
रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी एक जोरदार श्वास बाहेर पडला आणि गुरुजींची कुडी निष्प्राण झाली.
श्री गुरुजींचे पार्थिव संघ कार्यालयाच्या खालील मोठ्या दालनात आणले गेले. गुरुजी गेल्याची वार्ता नागपुरात आणि देशभर वाऱ्यासारखी पसरली.
काही मिनिटातच लोकांचे लोंढे महालच्या डॉ. हेडगेवार भवनाकडे लोटले. त्याचवेळी रेशीमबागेत सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात हे वृत्त कळताच स्वयंसेवकांनी महाल कार्यालयाकडे धाव घेतली.
आकाशवाणीने गुरुजींच्या महायात्रेचा कार्यक्रम जाहीर केला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जून १९७३ ला सकाळपासून देशभरातील लोक येउन पोहोचू लागले. श्री. एकनाथजी रानडे, श्री. बाळासाहेब देवरस, श्री. लालकृष्ण अडवाणी, श्री. अटलबिहारी वाजपेयी, आचार्य दादा धर्माधिकारी, श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. पाध्ये, न्या. चांदुरकर, राजे फत्तेसिंगराव भोसले, श्री. राजाराम महाराज भोसले, वसंतराव साठे, जांबुवंतराव धोटे, त्र्यं. गो. देशमुख, लोकमतचे संपादक पां. वा. गाडगीळ अशी अनेक मंडळी येउन गेली.
गुरुजींच्या पार्थिवाजवळ अखंड गीतापाठ सुरु होता.
दुपारी चारच्या सुमारास ध्वनिवर्धकावरून शांततेचे आवाहन करण्यात आले. सगळीकडे शांतता पसरली.
महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांच्या आवाजाने शांततेचा भंग केला.
गुरुजींनी २ एप्रिल १९७३ रोजी लिहिलेल्या तीन ऐतिहासिक पत्रांपैकी पहिले पत्र ते वाचू लागले.
संघकार्याची धुरा आपल्यानंतर सरसंघचालक म्हणून श्री. बाळासाहेब देवरस सांभाळतील असे त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केले होते. त्यानंतरची दोन पत्रे नूतन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी रुद्ध कंठाने वाचली. तिसऱ्या पत्राचा समारोप करताना गुरुजींनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग तर बाळासाहेब वाचूच शकले नाहीत.
त्यानंतर नूतन सरसंघचालकांनी महायात्रेला निघालेल्या द्वितीय सरसंघचालकांना पुष्पहार अर्पण केला.
भगव्या वस्त्राने झाकलेला या अद्भुत संन्याशाचा पार्थिव देह फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला आणि गुरुजींची अंत्ययात्रा सुरु झाली.
महालच्या डॉ. हेडगेवार भवनातून सुरु झालेली अंत्ययात्रा पाहण्यासाठी, गुरुजींचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अफाट जनसंमर्द मार्गावर सगळीकडे जमला होता.
संध्याकाळी पावणेसहाला सुरु झालेली ही अंत्ययात्रा दोन तासांनी पावणेआठ वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली.
जवळ जवळ तीन लाख लोक या महायात्रेत सहभागी झाले होते.
गुरुजींचे पार्थिव रेशीमबाग मैदानात पोहोचल्यावर गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण झाले.
त्याचवेळी श्री. माधवराव मुळे, राजमाता विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख आदी मंडळी पोहोचली. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर गुरुजींचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले.
१९४० साली ज्या ठिकाणी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना अग्नी देण्यात आला होता, त्याच स्थानाच्या बरोब्बर समोर पूर्वेला गुरुजींच्या चितेला अग्नी देण्यात आला. सरसंघचालकांना प्रणाम देण्यात आला. प्रार्थना झाली.
आदल्या दिवशी, ५ जून १९७३ रोजी प्रार्थना म्हणून आणि शेवटी `भारत माता की जय' म्हणून गुरुजींनी पार्थिव देहाची शीव ओलांडली होती.
६ जून १९७३ रोजी तशीच प्रार्थना म्हणून आणि `भारत माता की जय' म्हणून त्यांच्या आत्म्याने पार्थिव विश्वाची सीमा ओलांडली.
स्वत:चे श्राद्धही स्वत:च्या हातांनी उरकून घेतलेल्या या वीतरागी संन्याशाने जाताना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागितली होती.
आपला स्वभाव, आपल्या त्रुटी, आपले दोष यामुळे कोणी दुखावला असेल तर क्षमा करावी अशी विनंती करून अखेरीस संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत केला होता-
!! शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची !!
त्यांची स्मृती म्हणून ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्याच ठिकाणी यज्ञकुंडाची एक प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
राष्ट्रयज्ञात समिधेप्रमाणे आपले जीवन समर्पित करणाऱ्या गुरुजींच्या या समाधीवर तुकाराम महाराजांचा हाच अभंग गुरुजींच्या अक्षरातच लिहिण्यात आलेला आहे...


Friday, 27 April 2018

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ?

*आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ?*
(एक अभ्यासपूर्ण विवेचन)

साभार : सुजीत भोगले

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.

तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) https://www.speakingtree.in/allslides/mystery-behind-the-iron-pillar-of-qutab-minar/288949
या पेज ला भेट द्या. कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे का ??

२) https://www.quora.com/What-is-so-unique-about-the-Lepakshi-temple-Andhra-Pradesh

लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.

३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ???

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) https://plus.google.com/101257929962594949214/posts/gTq2Jyaj8ga
बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे कुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ?? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) http://justfunfacts.com/interesting-facts-about-meenakshi-amman-temple/

मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७) https://en.wikipedia.org/wiki/Konark_Sun_Temple

कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.

या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत.  ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीतीशाना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कोन्क्रीट ठासून भरले.

आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कोन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) https://en.wikipedia.org/wiki/Varāhamihira

हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

९)  http://www.ancientpages.com/2014/05/15/atomic-theory-invented-2600-years-ago-acharya-kanad-genius-ahead-time/

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.

https://hindufocus.wordpress.com/2009/07/16/the-sanskrit-verse-for-the-value-of-pi/
http://www.sanskritimagazine.com/vedic_science/value-pi-upto-32-decimals-rig-veda/

पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२)  आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) https://www.speakingtree.in/blog/from-kedarnath-to-rameswaram-7-ancient-shiva-temples-fall-in-straight-line-638811

प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.

मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.

याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो.
आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

 पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात... 

Thursday, 26 April 2018

प्रभू श्रीराम आणि लंकाधिपती रावण...

ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला

त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे.
रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा http://ift.tt/2xchNIX

सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.

झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.

रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.

मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."

आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?
अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.

ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."

ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.

रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."

आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!

विद्यमाने : The Awakening Times
स्त्रोत: Veda Vyasa Ramayana

Friday, 20 April 2018

अनिल बोकील यांचा अर्थक्रांती सिद्धांत


अनिल बोकील यांचा अर्थक्रांती सिद्धांत


​                अर्थक्रांती = अर्थतज्ज्ञ अनिल बोकील
अर्थक्रांती सिद्धांत
आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं कोणाला वाटणार नाही ? पण आपल्या खिशातपन्नास रुपयापेक्षा मोठी नोट असणे हाच ‘इकॉनॉमीकल ‘ लोचा आहे. या मोठ्या नोटांमुळेच बेकारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई आणि आर्थिक मंदी बोळाळलीय… हे सारे टाळण्यासाठी देशातील पन्नासच्या वरील सर्व नोटा बंद करा…… असे सांगत गेली काही वर्षं औरंगाबादचा एकअर्थतज्ज्ञ देशभर हिंडतोय. आपले हे ‘अर्थक्रांती ‘ चे स्वप्न साकारण्यासाठी तो आपली ही थेअरी लेख, पुस्तके, टीवी, इंटरनेटच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्याची ही थेअरी पाहून थेट पंतप्रधान, राष्ट्रपतीही चाट पडलेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व नरेंद्र मोदीनीं तर, ‘ जेव्हा मी या विधेयकावर सही करेनतो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षणअसेल ‘ असे सांगितलेय….त्या क्रांतिवेड्या अर्थतज्ज्ञाचे नाव आहे… अनिल बोकील 
अर्थक्रांती म्हणजे काहीतरी किचकट, अगम्य असं समजून आपण कायमच त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अनिल बोकील ती अधिकाधिक सोपा करून आपल्याला सांगण्याचा आटापिटा करताहेत. कारण पैसा हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा आणि आवडता भाग आहे. पण त्यामागचे अवघड गणित समजून घ्यायची आपली तयारी नसते. म्हणूनच त्यातला अवघडपणा काढला तर ते अधिक पारदर्शी होईल, असा बोकील यांना विश्वास आहे.
आपल्याकडे पन्नासाहून मोठी नोट नको, असे बोकील पुन्हापुन्हा सांगतात. आपले हे म्हणणे पटवून देण्यासाठी ते एक सोपे उदाहरण देतात. ते म्हणतात, अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न ४० हजार डॉलर आहे आणि त्यांची सर्वात मोठी नोट १०० डॉलर आहे. म्हणजेच त्यांच्या दरडोई उत्पन्नाचे मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे ४०० पट आहे. तसेच ब्रिटन आणि जपानचेही पौंड आणि येनशी असेलेले प्रमाण हेदेखील ४०० पटीचे आहे. पण भारताचे दरडोई उत्पन्न २३ हजार आणि सर्वात मोठी नोट १००० रुपयाची आहे. म्हणजे हे प्रमाण फक्त २३ एवढे आहे. कशासाठी ? या कमी प्रमाणामुळेच देशात काळ्या पैशाची निर्मिती होते. आपल्याकडील व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. लोक बॅकेच्या माध्यमातून व्यवहार करण्याऐवजी रोखीच्या माध्यमातून व्यवहार करतात. त्यामुळे या व्यवहारांची नोंद राहत नाही आणि काळा पैशावर आधारित भ्रष्ट अर्थव्यवस्था जन्माला येते. बोकील यांच्या मते आज आपल्या देशातील ८० टक्के व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. तेच प्रगत देशात ९० टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमातून होताना आढळतात. या रोखीच्या व्यवहारामुळेच काय घडू शकते, याचे उदाहरण द्यायचे तर भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचे देता येईल. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. त्याच्यापोठापाठ १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवरही हल्ला झाला. अमेरिकेला अल-कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले. पण भारतात मात्र संसदेवर हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्क उद्ध्वस्त करता आले नाही. याचे कारण अमेरिकेने अल-कायदाची सारी अकाउंट्स सीझ केली. त्यामुळे अल्-कायदाची पैसा हीच ताकद संपल्याने नेटवर्क उद्ध्वस्त करता आली. पण भारतात बहुतांशी व्यवहार रोखीच्या माध्यमातून होत असल्याने अशी अकाउंट्स सीझ करण्याचा काहीच फायदा झाला नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १४ जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्दकेल्या. याचे कारण अमेरिकेत प्रचंडकाळा पैसा वाढला होता. तसेच भारतातही आज या समांतर काळ्या इकॉनॉमीने हातपाय पसरले आहेत. ती संपवण्यासाठी पन्नासरुपयांच्या वरची नोट बंद करणे हेच हिताचे ठरेल.
भारतात रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी असणा-यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत. मात्र रिझर्व बँकेच्या अहवालानुसार १०० रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचे प्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजार रुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६ कोटी इतक्या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थ रोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देते आहे. हे फक्त या मोठ्या नोटा रद्द झाल्या तरच टाळता येणे शक्य आहे.
हे जसे झाले नोटांचे, तसाच एक लोच्या आपल्या करप्रणालीचा आहे. मुळातच टॅक्सचुकवणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे डायरेक्ट टॅक्सपेक्षाही इन्डायरेक्ट टॅक्स वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एक सामान्य भारतीय जवळपास ३०-३२ प्रकारचे टॅक्स भरत असतो.. तेही त्याच्या नकळत. म्हणजे जेव्हा आपण एखादा साबण घेतो तेव्हा त्याचे ४-५ रुपये आपण सरकारला विविध करांच्या रुपाने देत असतो. खरं तर एकंदरीतच भारतीय करप्रणाली कमालीची गुंतागुंतीची आणि दुर्बोध आहे. एखाद्या चार्टर्ड अकांउटलाही ती सहजसोपी करून सांगणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे तर एका टीव्हीची किंमत मुंबईत ५००० हजार असेल तर पनवेलमध्ये ती ५५०० असू शकेल. कारण त्यात जकात लागू होते. तसेच जर तुम्ही तो मध्य प्रदेशात घ्याल तर तो तुम्हाला कदाचित ४५०० रुपयांना मिळू शकेल, कारण तेथील सेल्स टॅक्स स्ट्रक्चर वेगळे आहे. त्यामुळे एकच वस्तू देशाच्या विविध भागात विविध किमतींना उपलब्ध होते. त्यामुळेच काळाबाजार तेजीत येतो. त्याहूनही डोकेदुखीची बाब म्हणजे, आपल्याच रुपयाची किंमत आपल्याच देशात विविध ठिकाणी वेगळी ठरते. या गुंत्यामुळे लोक जकात चुकवून काळ्या बाजाराने व्यापार करतात. बिलं न घेता वस्तू खरेदी करतात. या समांतर आणि काळ्या अर्थव्यवस्थेमुळे देशाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळेच ही करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तर टॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. कारण असा अवाढव्य टॅक्स कमी झाला आणि तर तो भरून ‘ गॅरेंटेड‘ माल घेणे कोणीही पसंत करेल. यासाठी बोकील एक साधीसोपी करप्रणाली सुचवतात.
दोन देशांमध्ये असलेली इम्पोर्ट ड्युटी वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे टॅक्स रद्द करावेत. त्याऐवजी सरकारने बॅंकेतून होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) ट्रॅन्झॅक्शन टॅक्स लागू करावा. हा टॅक्स थेट बॅंकेतूनच वजा होणार असल्याने दरवर्षी शेवटी टॅक्स भरण्यासाठी होणारा आटापिटाही बंद होईल. गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर आकारला जाणार नाही. म्हणजेच समजा मी तुम्हाला चेकद्वारे १०० रुपये दिले. तर माझ्या अकाउंटमधून १०० रुपये वजा होतील पण तुमच्या अकांउटला मात्र ९८ रुपयेच जमा होतील. त्या दोन रुपयांपैकी ७० पैसे केंद्र सरकारला, ६० पैसे राज्य सरकारला, ३५पैसे महानगरपालिकेसारख्या स्थानिक संस्थेला आणि उरलेले ३५ पैसे बँकेला महसुलाच्या स्वरूपात मिळतील. यामुळे सरकारला आपल्या कामासाठी सतत महसूल होत राहील आणि जनतेचीही टॅक्सच्या जंजाळातून सुटका होईल. या पद्धतीतून अनेक गोष्ट साध्य होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इन्डायरेक्ट टॅक्स संपल्यामुळे वस्तूंच्या किंमती कमी होतील. आपण आज जे चायनाच्या स्वस्त मार्केटचा बाऊ करतो, तो करण्याची वेळच येणार नाही. तसेच समानतेचे सूत्र पाळले जाईल. देशातील सर्व ठिकाणी एका वस्तूची किंमत समान राहील आणि त्यामुळे रुपयाचीही किंमत समान राहील. या करप्रणालीसोबतच बोकील म्हणतात की, २००० रुपयांवरील रोख व्यवहार बेकायदा ठरवावावेत. जेणेकरून बँकमनी वाढेल आणि बाजारात फक्त पैसा नाही तर भांडवलही वाढेल. कारण आपल्याकडे पैसा खूप आहे भांडवल नाही. आपल्याकडे असलेला पैसा हा योग्य हातात योग्य वेळी पडण्यासाठी असलेली यंत्रणाच कमकुवत ठरते आहे. त्यासाठीच आपल्या देशाला या अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही. अनिल बोकील ज्याला अर्थक्रांती म्हणतात , ती थोडक्यात अशी आहे
१) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढून टाकावेत.
२) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बँकेतून होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागू करणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते , त्यांच्याकडून हा कर बॅंकेतूनच कापून घेतला जाईल.
३) या मार्गाने जमा होणा-या कराचे वाटप केंद्र , राज्य , पालिका-महापालिका असे निश्चित करून ती रक्कम त्या सरकारच्या नावावर जमा होईल.
४) रोखीच्या व्यवहारांवर मर्यादा आणण्यासाठी पन्नास रुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात येतील.
५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोख व्यवहारास सरकारी मान्यता मिळेल. त्यापुढील रोखीचे व्यवहार बेकायदा मानले जातील.
६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न नसेल. या पद्धतीमुळे आता असलेला काळा पैसाही मुख्य प्रवाहात येईल. 
एकंदरीतच अर्थव्यवस्था शुद्धिकरणाची प्रक्रिया यातून साध्य होईल. कारण आज निवडणुकीपासून सर्व व्यवहार काळ्यापैशावर आधारीत आहे . हे राजकारणी काळ्या पैशाची निर्मिती करत नाही पण त्याचा वापर करतात. सामान्य जनताही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असते. ते रोखण्यासाठी २००० रुपयांवरील प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणारी ही पद्धत ‘ जादुई ‘ ठरू शकेल.
अनिल बोकील मांडत असलेली ही थेअरी या देशात क्रांती घडवायला सज्ज आहे. पण कोणताच बदल लगेच न स्वीकरणा-या या देशाला उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे, याचे पूर्ण भान बोकीलांना आहे. त्यांना जेव्हा विचारले जाते, की तुमची ही पद्धत क्रांतिकारी आहे, तर तातडीनेस्वीकारली का जात नाही ? तर ते एक गोष्टसांगतात…
आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावर मजले आहेत. तळातल्या मजल्यावर सामान्य माणूस आहे, त्यावर श्रीमंत, उद्योगपती आहेत आणि सर्वात शेवटच्या माळ्यावर कायदा करणारे राजकारणी आहेत. पण या जहाजाला खालून भोक पडलंय… कुणी कुठेही असला तरी जहाज बुडणार आहे. त्यामुळे खालचे मेले तरी वरच्यांनाही मरावेच लागेल. त्यामुळे भोक बुजवण्यासाठी राजकारण्यांनाही झुकावेच लागेल. फक्त प्रश्न केव्हा याचाच आहे ? बोकीलांचा हा आशावादच आपल्याला उभारी देणार आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळं निघाल्याची बोंब मारत जागतिक मंदी आली असली.. तरी पुढे फक्त अंधारच नाही.. तर अर्थक्रांतीचे आशेचे किरणही आहेत….
–    भ्रष्टाचाराला आळा घालण्यास आणि पारदर्शक कारभारास हि कर प्रणाली अवलंबणे खूप आवश्यक आहे. तेव्हा भारताची खरी प्रगती होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकापर्यंत हि कर प्रणाली पोहचावा आणि भारताला विकसित करूया.

कोण आहेत स्वामी असिमानंद ....

कोण आहेत स्वामी असिमानंद ....

हर्षल कंसारा
सौजन्य : मुंबई तरुण भारत

'स्वामी असिमानंद' हे नाव गेल्या ८-९ वर्षापासून चर्चेत आहे. तथाकथित हिंदू दहशतवादाच्या मालिकेत असिमानंद यांना देखील अडकवण्याचा मोठा प्रयत्न झाला. मात्र शेवटी सत्य जगासमोर आले. स्वामी असिमानंद यांच्याविरोधात पुराव्याच्या अभावामुळे त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. हैदराबाद येथील मक्का मशीद स्फोट, अजमेर दर्गा स्फोट, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट या घटनांमध्ये स्वामी असिमानंद यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या सर्वातून ते 'पुराव्याच्या अभावी' निर्दोष मुक्त झाले. यात पुराव्याच्या अभावी हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे मिळू शकलेले नाहीत.





अशा या असिमानंद यांच्याबद्दल माध्यमांमध्ये अनेकानेक चर्चा ऐकायला मिळतात. थेट दहशतवादी ठरविण्याचा अनेकांचा प्रयत्न असफल करणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या एकूण जीवनाबद्दल आपण जाणून घेऊयात.



पूर्वाश्रमीचे असिमानंद

स्वामी असिमानंद यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील हूगळी जिल्ह्यातील कामार्पुकुर येथे झाला आहे. संन्यस्थ जीवन अंगीकारण्यापूर्वी त्यांचे नाव जतीन चॅटर्जी असे होते. ओमकारनाथ या नावाने देखील ते ओळखले जात. त्यांचे वडील बिभूतीकुमार सरकार हे स्वातंत्र्य सेनानी असून, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास पत्करला होता. ७ भावंडांपैकी एक असलेले असिमानंद यांनी भौतिकशास्त्रात एम. एस्सी. पर्यंतचे शिक्षण, पश्चिम बंगाल येथील बर्धमान विद्यापीठातून पूर्ण केले आहे.





कामार्पुकुर हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे तेथे रामकृष्ण मिशनचे मोठे कार्य प्रस्थापित आहे. असिमानंद देखील त्या कामात जोडले गेले. त्यामाध्यमातून त्यांनी नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम येथे अनेकवर्षे वनवासी क्षेत्रात सेवा काम केले. त्यांचे गुरु स्वामी परमानंद यांनी त्यांना असिमानंद हे नाव दिले. त्यानंतर ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.





वनवासी समाजाची सेवा

स्वामी असिमानंद हे मुख्यत्वे वनवासी क्षेत्रात सेवा काम करण्यासाठी ओळखले जातात. वनवासी जाती, जमातींना हिंदुत्वाशी जोडून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्राण्यांची बळी देणे, यांसारख्या वनवासी जमातींतील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचे देखील मोठे काम त्यांनी केले आहे. असिमानंद यांच्याशी जोडले गेलेले अनेक वनवासी कुटुंबीय आजही मांसाहाराचे सेवन वर्ज्य मानतात. त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे भक्तीभावाचे वातावरण रुजवत असतात. ज्यामुळे अनेक वनवासी बांधव त्यांच्याशी जोडले जाऊ लागले. वनवासी समाजातून मतांतरण होण्याचे प्रमाण देखील यामुळे मोठ्याप्रमाणात घटले.





वनवासी समाजाची सेवा करण्याचे मुख्य ध्येय असलेल्या असिमानंद यांनी यासाठी अनुकूल त्या प्रत्येक संघटनेची मदत घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध जोडला जात असला तरी देखील, त्यांनी सलग राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम केलेले नाही. संघ परिवारातील वनवासी कल्याण आश्रम या वनवासी क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या संघटने सोबत त्यांनी काम करायला सुरु केले. १९८८ साली त्यांनी अंदमान निकोबार बेटांतील वनवासी समाजात काम सुरु केले. तेथे लहान झोपड्या तयार करून त्यांनी काम सुरु केले. सहज वनवासी लोकांसोबत जाऊन राहणे, त्यांच्यासोबत जेवण करणे, अनेक कथा, भजन, गीत, सेवाकार्य यांच्यामाध्यामातून ते लोकांना संघटीत करत असत. आजही दक्षिण अंदमानमध्ये स्वामी असिमानंद यांनी स्थापन केलेल्या हनुमानाची मूर्ती तेथे स्थित आहे.





अंदमान निकोबार येथे काम केल्यानंतर त्यांनी काही काळ झारखंड आणि महाराष्ट्रात काम देखील काम केले. १९९० च्या दशकात ते गुजरातमधील डांग जिल्ह्यात आले. आणि त्यानंतर तेथेच मोठा काळ स्थिरावले. डांग जिल्ह्यातील वनवासी समाजात आजही अनेक कुटुंबीय हे स्वामी असिमानंद यांचे अनुयायी आहेत. याचे मूळ कारण म्हणजे असिमानंद यांनी केलेले सेवा आणि धार्मिक कार्य. रामायणातील शबरी डांग जिल्ह्यातील होती, असे असताना स्वामी असिमानंद यांनी शबरीमातेचे मोठे मंदिर व्हावे म्हणून संपूर्ण परिसरात १९९८ साली लोक चळवळ सुरु केली. डांग जिल्ह्यातील सुबीर येथे शबरीधाम व्हावे म्हणून, गुजरातमधील डांग, तापी, सुरत, नर्मदा तसेच महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांतून त्यांना मोठ्याप्रमाणात वनवासी समाजाचा प्रतिसाद मिळत गेला.





परंतु या कामाला तेथील स्थानिक ख्रिश्चन मिशनर्यांनी मोठा विरोध केला होता. स्वामी असिमानंद यांची वाढती जाणारी लोकप्रियता, शबरीधाम तयार करण्याचे प्रयोजन, म्हणून स्थानिक वनवासी समाजाचे ख्रिश्चन मिशानार्यांकडे जाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे तेथे विरोध केला जात होता. त्यावेळी माध्यमांमध्ये देखील असिमानंद यांची चर्चा सुरु झाली होती. परंतु या सर्वाची तमा न बाळगता, वेळी धोका पत्करून त्यांनी शबरीधामसाठी कार्य करणे सुरु ठेवले. त्यांना स्थानिकांचा मोठ्याप्रमाणात पाठींबा होताच. ते काम लोकसहभागातून पूर्ण झाले, आज शबरीधाम हे वनवासी समाजासाठी एक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाते.





२००६ साली याच धर्तीवर शबरी कुंभाचे आयोजन हे स्वामी असिमानंद यांच्या मुख्य सहभागातून करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण भारतभरातून वनवासी बांधव एकत्र आले होते. माता शबरी प्रती अपार श्रद्धा असलेल्या वनवासी समाजाच्या या भव्य एकत्रीकरणामुळे तेथे अनेक विकासाची कामे देखील स्थानिक सरकार तर्फे करण्यात आले होते.





सुबीर येथे असलेले स्वामी असिमानंद यांचे आश्रम आजही सर्वांसाठी खुले असते, तेथे कुठल्याही जाती, पंथ, समुदायातील व्यक्तीचे स्वागतच होते. स्थानिक वनवासी समाजाकडून ते चालवले जाते. तेथे माता शबरीचे भव्य मंदिर आणि स्वामी असिमानंद यांनी उभारलेल्या कामातून स्थानिकांचा स्नेह, हे मिळवून मन सुखावल्यासारखे होते.

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ???? हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्...