Friday, 20 October 2017

चला साजरी करू एक विस्मरणीय दिवाळी

"चला साजरी करू एक विस्मरणीय दिवाळी" या शिर्षकाला साजेसा असा "उपक्रम सावली" पार पडला त्याच्यावर भाष्य करणारा माहितीपट कृपया खाली दिलेल्या Link वर जाऊन नक्की पहा, Like करा आणि Share करा.


👇🏻


विडिओ आवडला तर Comment नक्की करा.



Friday, 9 June 2017

आपली राष्ट्रीय दांभिकता

*आपली राष्ट्रीय दांभिकता*

*देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल*
*तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.*
सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.

*बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे. भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.*

*‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत*
*सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरुन निलंबनच करायला हवे.*

*हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.*

*बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे. ‘लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरुन नेतात. अगदी रोज नेतात. अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस.?’*

एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने, एका
प्राणी संग्रहालयात, पिंजर्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
*ऐतिहासिक इमारतींवर स्वताचे आणि स्वताच्या टिनपाट मत्रिणीचे नाव कोरणारे,*
कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करुन पाणी न टाकता निघून जाणारे,
शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे,
सार्वजनिक ऊत्सवात, लोकांकडून जमविलेल्या  वर्गणीतून अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,
सार्वजनिक गणेशोत्सव  बाप्पाच्या पुढ्यातील  फुले प्रसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे ऊत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे  महाभाग,

रस्त्यावरची बाकडी, रोड डिव्हायडर, फरशा चोरुन नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे. हीच आपली ओळख आहे.

 या ओळखीबद्दल काय बोलणार?
*वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते.?*

*सरकार बदलून खूप प्रयोग करुन झाले. त्याने काही फरक पडत नाही.*
*आता जनताच बदलायला पाहिजे.*
*या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले*
*नागरिक देशातून हाकलवून देऊन*
*बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक*
*आयात करणे अतिशय आवश्यक आहे.*

*आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा.!*

*सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे.?*

( लोकसत्ता_लोकरंग मधून संकलित)

Sunday, 14 May 2017

बालपणीची कोकणातील उन्हाळी सुट्टी

नमस्कार,
सर्वप्रथम आपण माझ्या पोस्टनां देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार.

आज मी, माझ्या बालपणी मामाच्या गावी (आजवळी) घालवलेल्या उन्हाळी सुट्टी बदल लिहत आहे.

मी ॐकार एकनाथ सुहासिनी वारीक.
माझं गाव नाडण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
आणि माझं आजवळ (मामाचं गाव) वानिवडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

गाव तळ-कोकणात असल्यामुळे कोकणची निसर्ग सुंदरता बालपणा पासूनच अनुभवलेली. आणि आमची मायबोली मालवणी भाषेत संवाद करणं खूप आवडीच काम. तसा माझा जन्म मुंबईचा असल्यामुळे गावचं आकर्षण खूपच आहे. लहानपणी शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याकी आमचं पूर्ण कुटुंब मस्त २ महिन्यासाठी गावाला जायची तयारी करायचो. गावी जाणार या विचारानेच चेहरा कसा खुलून जायचा. आमचा आनंद गगनात मावायचा नाही. हळू हळू गावी जायचा दिवस जवळ यायचा आणि मनाला लागलेली उत्सुकता अजूनच वाढायची.

आम्ही गावी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या गाडीने (लाल डब्बा/एसटी) जायचो. (कणकवली पासून आमचं गाव खूप आत असल्याने रेल्वे ने शक्यतो नाही जायचो.)
लाल डब्यातून गावी जायचा आनंदच काही वेगळा आहे.

जस जस गाव जवळ येत तस तस आनंद वाढत असे.
गावी पोहचल्यावर काका आणि त्यांची मूलं आम्हाला घ्यायला थांब्यावर यायचे. थांब्यापासून घरी जाईपर्यंत बहुतेक सगळी चौकशी झालेली असायची.
सकाळीच गावी पोहचल्यामुळे घरी जाई पर्यंत निसर्गाचं रम्य दर्शन होत असे, पक्षांची किलबिल, पाणी तापवण्यासाठी पेटवल्या चुलीच्या धुराचा वास, आमराईचा सुगंध, गाई म्हशी चरायला जाताना असं बरंच काही.

दोन तीन दिवस आमच्या घरी वस्ती केल्यानंतर आमची स्वारी प्रस्थान करायची मामाच्या गावी. कारण आमच्या गावी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असे.

मामाच्या गावी जाण्यासाठी आमच्या गावावरून सकाळी ६ ची एसटी आहे. पण इतक्या सकाळी उठून जाण्यापेक्षा आम्ही ९ वाजताच्या गाडीने मोंड या गावात जायचो. मोंड पासून मामाचं गाव रस्ता मार्गे लांब आहे पण मध्ये नदी असल्यामुळे होडीने पैलाडी (पलीकडे) जायचो.
माझ्या मामाचं गाव वानिवडे आणि इथं बारमाही वाहणारी नदी आहे, आमराई तसेच माडाच्या बाग आहेत.

मामाच्या गावी माझी आजी (आये), ३ मामा-मामी आणि त्यांची चिल्लर पार्टी आहेत. अगदी "झुक झुक अगिन-गाडी...." या गाण्यातील शब्दानं प्रमाणे माझ्या मामाचा वाडा चिरेबंदी आहे. समोर मोठं अंगण (खळ), आजूबाजूला आमराई, माडाची झाड आणि त्यावर किलबिल करणारे पक्षी. आजही मी या गोष्टी अनुभवण्यासाठी तेवढाच उत्सुक असतो.

घरात खूप भावंड पण माझ्या मोठ्या मामाचा मुलगा निलेश हा माझ्या समवयस्क असल्याने त्याची आणि माझी मस्त बनायची. मामासोबत आंबे काढायला जाणे, नदी वर आंघोळ करणे, फिरायला जाणे, आणि ट्रकात बसून लग्नाला इत्यादी गोष्टी आम्ही एकत्र करायचो.
मला सायकल चालवायला पण त्यानेच शिकवली.
फोफळीच्या झावळी वापरून गाडी बनवणे आणि त्यावर बसून एकमेकांना ओढणे
दुपारच्या वेळेत कुरल्या (खेकडे), चिंगळ (झिंगा) पकडायला जाणे. सायकल वरून डबलसीट फिरणे हे आमचे उद्योग चालू असायचे.

मोकळ्या वेळात आंब्याच्या पेट्यांच्या फळ्या काढून त्याचा ट्रक बनवणे आणि त्यातून माल वाहतूक करणे मला खूप आवडायचं.

संध्याकाळच्या वेळेत आम्ही सगळे सड्यावर पावणाई देवीच्या दर्शनाला जायचो. सडा चढत असताना थकायला व्हायचं. पण सड्यावरून दिसणार निसर्ग सौदंर्य पाहताच मन कस भरून यायचं. देवीच दर्शन घेतल्या नंतर सगळा थकवा कसा निघून जायचा. मग परतीच्या वाटेवर असताना चांदवडच्या पानात कोकणचा रानमेवा जमा करायला आमच्यात स्पर्धा लागे. करवंद, चाराभोरा (चारोळ्या), काजू, फणस, आंबे जमा करून आपल्या सोबत गोळा करून घेऊन यायचो आणि मग एकत्र मिळून त्यावर ताव मारायचा, खरच खूप विलक्षनिय अनुभव आहेत.

खरी मज्जा तर तेव्हा यायची जेव्हा आम्ही सगळे भाचे-भाची एकत्र यायचो. खूपच मज्जा धमाल व्हायची.

घरच्या म्हशी असल्याने घरात दुधाला कमी नव्हती.
त्याशिवाय मामींनी बनवलेले घावणे, आंबोळ्या, शेवया, मोदक, लाडू, आंब्याचा रायता खाऊन पोट कस मस्त भरायचं.

कधी कधी संध्याकाळच बांदावर किंवा शाळेजवळच्या रस्त्यावर फेरफटका मारणे, नदी जवळ किंवा मळ्यात खेळायला जाणे. आणि काळोख पडायच्या अगोदर घरात येणे. घरी आल्यानंतर खळ्यात बसून मामाने सांगितलेल्या भुताच्या पण खऱ्या गोष्टी ऐकायच्या.

हळू हळू सुट्टी संपायची, परत मुंबईला यायची वेळ व्हायची, आणि मनावर दगड ठेऊन गावावरून कोकणचा रानमेवा आणि भेटी घेऊन मुंबईला परत यायचो...

हे सगळं मी तसेच माझ्या सारख्या कित्येकांनी अनुभवलंय कारण तेव्हा आमच्या हातात मोबाईल नावच उपकरण नव्हतं त्यामुळे आमच्या उन्हाळी सुट्ट्या निसर्गाच्या सानिध्यात घालवल्या जायच्या. पण हल्लीची मुलं सुट्टीच्या दिवसात दिवसभर मोबाईल, संगणक आणि क्लास यात इतके गुंतले आहेत की त्यांना मैदानात यायला पण वेळ नसतो.

माझी सगळ्या पालकांना विनंती आहेकी आपल्या मुलांना  यंत्रांमध्ये गुंतवून यंत्रमानव करण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सानिध्यात आपल्या गावी नेऊन खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवा.
कारण आमच्या वेळेपर्यंत सुट्टीच्या दिवशी मुलं मैदानातच दिसायची पण आज मैदान रिकामी आणि मुलं वायफाय च्या सानिध्यात बसलेली दिसतात.

पूर्ण वाचल्याबद्दल आपला खूप आभारी आहे.
ॐकार एकनाथ सुहासिनी वारीक (SCIENTIST)

Sunday, 7 May 2017

देवगड_हापूस_आंबा_महोत्सव

#देवगड_हापूस_आंबा_महोत्सव

सिंधुदुर्गचे आमदार नितेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील ग्राहकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी दिनांक ६ मे २०१७ ते ८ मे २०१७ पर्यंत दामोदर नाट्यगृह, परेल, मुंबई येथे आयोजित केलेल्या #देवगड_हापूस_आंबा_महोत्सवाला आज भेट दिली.

महोत्सवाच्या पटांगणात प्रवेश करताच क्षणी देवगडच्या हापूस आंब्याच्या दरवळणाऱ्या सुवासाने मन कसे प्रफ्फुलीत होते.

सदर महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, गिर्ये, नाडण, वानिवडे, लिंगडाळ, वाघोटण इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील अस्सल हापूस आंबे विक्रीस आणले आहेत.

अस्सल हापूस आंब्याची चव चाखायची असल्यास #देवगड_हापूस_आंबा_महोत्सवाला जरूर भेट द्या.

टीप :- उद्याचा दिवस हा महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.








https://m.facebook.com/story.php?story_fbid=1307426166039990&id=100003178586813


Saturday, 6 May 2017

ॐ मित्र मंडळ आयोजीत "घाटकोपर ते शिर्डी" यात्रा...

दिनांक ३ जून आणि ४ जून रोजी....
३ जून रोजी रात्री ८.०० वा अमृत नगर, घाटकोपर (प) येथून बस सुटतील.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

Tuesday, 11 April 2017

घाटकोपरची गांवदेवीमाता

नवसाला पावणारी घाटकोपर (पश्चिम) येथील पद्मावती माता..
वार्षिक पालखी सोहळा रविवार दिनांक १६ एप्रिल २०१७ रोजी..
(वाचा आणि शेअर करा )

घाटकोपर पश्चिम, अमृतनगर स्टेशनपासून २ किलोमीटरच्या अंतरावर असलेले स्वयंभु पद्मावती माता. नवसाला पावणारी देवी म्हणून स्थानिक रहिवांशी आवर्जुन सागतात. स्थानिक रहिवाशांच्या घरातील शुभकार्य करण्यापूर्वी प्रथम पद्मावती मातेची ओटी भरली जाते. ही पद्मावती माता गांवदेवी मंदिरामध्ये वसलेली असल्यामुळे गांवदेवी मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. १९३२ सालापासून येथे वार्षिक पालखी उत्सव साजरा केला जातो हा यावर्षीही १६ एप्रिल २०१७ रोजी तो साजरा केला जाणार आहे.

पद्मावती माता मंदिर स्थापनेची दंतकथा..
१९३२ साली घाटकोपर येथे श्री. बाबा रामदास राजाराम यांना खोदकाम करत असताना येथे स्वयंभु पद्मावती माताची मूर्ती मिळाली ती पाडंवकालीन असल्याचे कळते. श्री. बाबा रामदास यांनी तेथे छोटे मंदिर उभारुन त्याचे गांवदेवी मंदिर म्हणून नामकरण केले व पूजा सुरु केली ते १९७२ पर्यंत पूजा व मंदिरातील देखभाल करत होते. १९७२ साली त्याचे निधन झाले त्यानंतर त्याची पत्नी मईबाई यांनी २००२ पर्यंत या मंदिराचे काम बघितले त्या २००२ आजारी पडल्यामुळे त्यांनी त्याचे घरातील व्यक्ती श्री. पारसनाथ यांना या मंदिराची जबावदारी दिली ते अजून पर्यंत श्री. पारसनाथ ती सांभाळत आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेटलो तेव्हा त्यांनी असे सांगितले अगोदर येथे येणा-या भाविकांची संख्या खूप कमी होती पंरतु भाविकांनी नवस बोलला की तो पूर्ण होतो त्यामुळे भाविकांचा ओघ वाढत चालला आहे, ती संख्या ऐवढी वाढली आहे की नवराला पावणारी देवी म्हणून प्रसिध्द झाली आहे.

वार्षिक पालखी उत्सव...
पद्ममावती मातेची वार्षिक पालखी उत्सवाची सुरुवात पहाटे दिपपूजा व गणेशपुजाने सुरु होते. त्यानंतर तेथे भजन व किर्तन केले जातात. दुपारी १ नंतर १०८ वेदाचे मंत्राने होम हवन दुपारी २ वाजेपर्यंत चालतात नंतर ३ च्यासुमाराच आरती करुन देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडते ते जाते घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी जवळील मंदिरात तेथे पद्ममावती माता आपल्या बहिणीला भेटायला जाते असे श्री. पारसनाथ यांनी सांगितले परंतु ते १९३२ पासून हे सुरु आहे त्याबद्दल त्यांची काही दंतकथा आहे का हे विचारले असता त्याबद्दल अधिक माहिती नाही असे त्यांनी सांगितले परंतु त्यांनी हे सांगितले की गांवदेवी मंदिरातून निघालेली पालखी घाटकोपर (पूर्व) गेल्यानंतर परत पालखी गांवदेवी मंदिराच्या दिशेन प्रस्तान करते तेव्हा ती पालखी खूप जड झालेले असते ते काही अजून पर्यंत समजू शकलेले नाही. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ती पालखी गांवदेवी मदिरात दाखल होते व नंतर महाआरती होऊन तेथे महाप्रसाद सर्वांना दिला जातो. श्री. पारसनाथ सांगतात ही महाप्रसादसाठी मागील वर्षी ६००० भाविकांची उपस्थिती होती. त्यामुळे भाविकांचा ओघ वाढत आहे. अशा प्रकारे वार्षिक पालखी उत्सवाची सांगता होते.

खालील विडिओ वर जाऊन तुम्ही गेल्या वर्षीचा नयनरम्य पालखी सोहळा पाहू शकता.



🙏 धन्यवाद  🙏

Sunday, 26 March 2017

Wanna kill yourself? Imagine this. You come home from school one day. You’ve had yet another horrible day. You’re just ready to give up. So you go to your room, close the door, and take out that suicide note you’ve written and rewritten over and over and over You take out those razor blades, and cut for the very last time. You grab that bottle of pills and take them all. Laying down, holding the letter to your chest, you close your eyes for the very last time. A few hours later, your little brother knocks on your door to come tell you dinners ready. You don’t answer, so he walks in. All he sees is you laying on your bed, so he thinks you’re asleep. He tells your mom this. Your mom goes to your room to wake you up. She notices something is odd. She grabs the paper in your hand and reads it. Sobbing, she tries to wake you up. She’s screaming your name. Your brother, so confused, runs to go tell Dad that “Mommy is crying and bro won’t wake up.” Your dad runs to your room. He looks at your mom, crying, holding the letter to her chest, sitting next to your lifeless body. It hits him, what’s going on, and he screams. He screams and throws something at the wall. And then, falling to his knees, he starts to cry. Your mom crawls over to him, and they sit there, holding each other, crying. The next day at school, there’s an announcement. The principal tells everyone about your suicide. It takes a few seconds for it to sink in, and once it does, everyone goes silent. Everyone blames themselves. Your teachers think they were too hard on you. Those mean popular girls, they think of all the things they’ve said to you. That boy that used to have fight with he can’t help but hate himself for never telling you how smart and helpful you really are. Your ex girlfriend, the one that you told everything to, that broke up with you.. she can’t handle it. She breaks down and starts crying, and runs out of the school. Your friends? They’re sobbing too, wondering how they could never see that anything was wrong, wishing they could have helped you before it was too late. And your best friend? She’s in shock. She can’t believe it. She knew what you were going through, but she never thought it would get that bad… Bad enough for you to end it. She can’t cry, she can’t feel anything. She stands up, walks out of the classroom, and just sinks to the floor. Shaking, screaming, but no tears coming out. It’s a few days later, at your funeral. The whole town came. Everyone knew you, that boy with the bright smile and bubbly personality. The one that was always there for them, the shoulder to cry on. Lots of people talk about all the good memories they had with you, there were a lot. Everyone’s crying, your little brother still doesn’t know you killed yourself, he’s too young. Your parents just said you died. It hurts him, a lot. You were his big brother, you were supposed to always be there for him. Your best friend, she stays strong through the entire service, but as soon as they start lowering your casket into the ground, she just loses it. She cries and cries and doesn’t stop for days. It’s two years later. Your teachers all quit their job. Those mean girls have eating disorders now. Your ex girlfriend doesn’t know how to love anymore and just sleeps around with boys. Your friends all go into depression. Your best friend? She tried to kill herself. She didn’t succeed like you did, but she tried…your brother? He finally found out the truth about your death. He self harms, he cries at night, he does exactly what you did for years leading up to your suicide. Your parents? Their marriage fell apart. Your dad became a workaholic to distract himself from your death. Your mom got diagnosed with depression and just lays in bed all day. People care. You may not think so, but they do. Your choices don’t just effect you. They effect everyone. Don’t end your life, you have so much to live for. Things can’t get better if you give up. I’m here for absolutely anyone that needs to talk, no matter who you are. Even if we’ve NEVER talked before, I’m here for you. Copy and paste this as your status to show people there are people out there that care.let's see who actually read all of it.
For anyone that feels this way
Could 1 friend, please copy and repost (not share)? We are trying to demonstrate that someone's always listening.
#SuicideAwareness
#SuicideAintTheSolutionFightingYourProblemIs
Always there for anyone who is in need !!🌞

Tuesday, 28 February 2017

List of Historical Wonders of India

List of Historical Wonders of India

India’s most beautiful wonders includes grand forts, Greatest Palaces and Amazing Temples. The list of wonders in India would be different for seven natural Wonders, architectural wonders and Historical Wonders of India. Walk Through India come up with the amazing list of India’s historical places which are known as the some of the best wonders of world.

Konark Sun Temple


The Konarak Sun Temple constructed with Sandstone  King Narasimhadeva I in Eastern Ganga Dynasty. The magnificent Konark Sun Temple most renowned temples in India and one of the Seven Wonders of India.

Khajuraho Group of Monuments







The Khajuraho Group of Monuments has been listed as a UNESCO World Heritage Site, and considered to be one of the seven Indian wonders. Khajuraho is one of the most popular tourist destinations in India.

Nalanda



Nalanda complex was a religious center of learning, located south east of Patna city. The ancient site of Nalanda International University attracted scholars and students from around the world.

Taj Mahal



The white marble mausoleum was built by Mughal emperor Shah Jahan in Agra, Uttar Pradesh. Taj Mahal is admired masterpieces in the world’s heritage and known as the jewel of Muslim art in India.

Harmandir Sahib



The Golden Temple, a Sikh Gurdwara situated in the Amritsar city of Punjab. Harmandir Sahib is holiest place in Sikhism and its doors symbolize the openness of all people and religions.

Hampi Monuments



A Hampi is a village in northern Karnataka and a important religious centre. The Group of Monuments at Hampi are listed as one of the seven wonders of India.

Gomateshwara Statue



The monolith statue of Gomateshwara at Shravanabelagola in the Hassan district of Karnataka is voted as one of the Seven Wonders of India. Shravanabelagola is one of the most important pilgrimage destinations in Jainism.

Meenakshi Temple



The Meenakshi Amman Temple is a historic Hindu temple, located in the city of Madurai in Tamil Nadu. Meenakshi Mandir is one of the largest Hindu temple and also nominees as New Seven Wonders of the World.

Jaisalmer Fort



Jaisalmer Fort or the Golden fort is situated in the great Thar Desert, on Trikuta Hill at Jaisalmer city of Rajasthan. It is one of the largest forts in the world and one of the most breathtaking monuments in the locality of Jaisalmer.

Dholavira Site



The archaeological site is one of the five largest Harappan sites, located in the Kutch Desert Wildlife Sanctuary in Great Rann of Kutch. The ancient site at Dholavira was locally known as Kotada Timba Prachin Mahanagar.

Red Fort



The Red Fort or Lal Qila was the palace for Mughal Emperor Shah Jahan, lies along the Yamuna River. It was designated a UNESCO World Heritage Site and listed as one of seven wonders of India.

Tawang Monastery



The largest monastery in India, Tawang Monastery is situated at an elevation of about 10,000 ft in the Tawang Town of Arunachal Pradesh. It is one of the biggest Buddhist monasteries in the world outside of Lhasa, Tibet.

Lotus Temple



The Bahai House of Worship is a prominent attraction in the city and One of the seven wonders of India. Lotus Temple is serves as the Mother Temple of the Indian subcontinent.

Victoria Terminus



The Chatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station is a historic railway station Located in Mumbai. Victoria Terminus is the busiest railway station in India.

Howrah Bridge



The Howrah Bridge or Rabindra Setu is 2,313.0 ft long cantilever bridge across the Hooghly River. Howrah Bridge connect the two cities Howrah and Kolkata, Its famous symbol of West Bengal.

Akshardham



The Hindu temple is the largest comprehensive Hindu temple in world, located near the banks of the river Yamuna. Akshardham temple complex has a musical fountain,monuments and large landscaped gardens.

Vivekananda Rock



Vivekananda Rock Memorial is one of the sacred monument in India and the most popular tourist attraction of Kanyakumari. From the Vivekananda Rock amazing view of the merger of three seas Bay of Bengal, Arabian Sea and Indian Ocean can be seen.

Charminar



The most famous monument and mosue of Hyderabad, Andhra Pradesh. Charminar is listed among the most recognized structures of India,made of granite, limestone, mortar and pulverised marbles.

Chand Baori



Chand Baori is one of the most famous stepwell, located in the village of Abhaneri of Rajasthan. The 100 feet into the ground stepwell is one of the deepest and largest stepwells in India.

Pamban Bridge



The Pamban Bridge is one of the India's most Amazing Bridges, located  on the Palk Strait connects Rameswaram on Pamban Island to mainland India. It is India’s first sea bridge and the second longest sea bridge in India.

Kesariya Stupa



The Kesaria stupa site is located in Champaran Bihar, built by the King Ashoka. Kesaria stupa is the tallest and the largest Buddhist Stupa in the world and one of the largest stupa in India as well.

Janjira Sea Fort



The Murud Janjira Sea Fort is situated on an island in the coastal village of Murud in the Raigad district of Maharashtra. Janjira is considered as one of the strongest marine forts in India, being other are Sindhudurg Fort,Vijaydurg and Kolaba Fort.

Lonar Crater Lake



The saline soda lake is situated in Buldana district of Maharashtra and created by a meteor impact. Lonar Crater lake is 150 meters deep and mean diameter of 1.2 kilometres. Lonar lake of India is considered as one of the most beautiful lonar lake in the world. Request you to suggest us more to in the list of wonders of India.


Sindhudurg Sea Fort                                                                                                                                                                                                                                                                       
                                                                                                                                                                                                                                                                                                                  Sindhudurg Sea Fort is a historical fort that occupies an islet in the Arabian Sea, just off the coast of Maharashtra in Western India. The Fortress lies on the shore of Malvan town of Sindhudurh District in the Kokan region of Maharashtra, 450 killometres (280 mi) south of Mumbai. It is a protected monument.



Thank You For Read This.....
Omkar Eknath Warik

Wednesday, 15 February 2017

15 Famous Indian Scientists And Their Inventions






15 Famous Indian Scientists And Their Inventions


From C. V. Raman to Salim Ali, the talents of Indian scientists and inventors have been fully established in many different areas, including physics, medicine, mathematics, chemistry and biology. Some of them have also contributed in a substantial way to advanced scientific research in many different regions of the world.
This article will discuss the famous Indian scientists and inventors throughout history and their wonderful contributions.

Prafulla Chandra Ray


Famous academician and chemist, known for being the founder of Bengal Chemicals & Pharmaceuticals, India’s first pharmaceutical company.

Salim Ali


Naturalist who helped develop Ornithology; also known as the “birdman of India”.

Srinivasa Ramanujan


Mathematician known for his brilliant contributions to contributions to mathematical analysis, number theory, infinite series and continued fractions.

C. V. Raman


Physicist who won Nobel Prize in 1930 for his Raman Effect.

Homi Jehangir Bhabha


Theoretical physicist; best known as the chief architect of the Indian atomic energy program.

Jagadish Chandra Bose


Physicist, biologist and archaeologist who pioneered the investigation of radio and microwave optics.

Satyendra Nath Bose


Mathematician and physicist; best known for his collaboration with Albert Einstein in formulating a theory related to the gaslike qualities of electromagnetic radiation.

A.P.J. Abdul Kalam


Known for his crucial role in the development of India’s missile and nuclear weapons programs.

Har Gobind Khorana


Biochemist who won the Nobel Prize in 1968 for demonstrating how the nucleotides in nucleic acids control the synthesis of proteins.

S.S. Abhyankar


Mathematician; famous for his outstanding contributions to algebraic geometry.

Meghnad Saha

Astrophysicist who developed the Saha equation, which explains chemical and physical conditions in stars.

Subrahmanyan Chandrasekhar


Astrophysicist won the Nobel Prize in 1983 for his research on the evolutionary stages of massive stars.


Raj Reddy


A.M. Turing Award-winning computer scientist, best known for his work related to large scale artificial intelligence systems.

Birbal Sahni

Paleobotanist known for his research on the fossils of the Indian subcontinent.

Prasanta Chandra Mahalanobis

Statistician and physicist who founded the Indian Statistical Institute.
Thanking You

Omkar Eknath Warik

Tuesday, 14 February 2017

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त विशेष लेख (शिवरायांचा कार्यकाळ)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त विशेष लेख (शिवरायांचा कार्यकाळ)

छत्रपती शिवाजी महाराज 





          बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.


प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)


आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.


शिवाजीराजे व मुघल -

शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले. 

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ???? हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्...