Sunday, 14 May 2017

बालपणीची कोकणातील उन्हाळी सुट्टी

नमस्कार,
सर्वप्रथम आपण माझ्या पोस्टनां देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार.

आज मी, माझ्या बालपणी मामाच्या गावी (आजवळी) घालवलेल्या उन्हाळी सुट्टी बदल लिहत आहे.

मी ॐकार एकनाथ सुहासिनी वारीक.
माझं गाव नाडण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
आणि माझं आजवळ (मामाचं गाव) वानिवडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

गाव तळ-कोकणात असल्यामुळे कोकणची निसर्ग सुंदरता बालपणा पासूनच अनुभवलेली. आणि आमची मायबोली मालवणी भाषेत संवाद करणं खूप आवडीच काम. तसा माझा जन्म मुंबईचा असल्यामुळे गावचं आकर्षण खूपच आहे. लहानपणी शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याकी आमचं पूर्ण कुटुंब मस्त २ महिन्यासाठी गावाला जायची तयारी करायचो. गावी जाणार या विचारानेच चेहरा कसा खुलून जायचा. आमचा आनंद गगनात मावायचा नाही. हळू हळू गावी जायचा दिवस जवळ यायचा आणि मनाला लागलेली उत्सुकता अजूनच वाढायची.

आम्ही गावी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या गाडीने (लाल डब्बा/एसटी) जायचो. (कणकवली पासून आमचं गाव खूप आत असल्याने रेल्वे ने शक्यतो नाही जायचो.)
लाल डब्यातून गावी जायचा आनंदच काही वेगळा आहे.

जस जस गाव जवळ येत तस तस आनंद वाढत असे.
गावी पोहचल्यावर काका आणि त्यांची मूलं आम्हाला घ्यायला थांब्यावर यायचे. थांब्यापासून घरी जाईपर्यंत बहुतेक सगळी चौकशी झालेली असायची.
सकाळीच गावी पोहचल्यामुळे घरी जाई पर्यंत निसर्गाचं रम्य दर्शन होत असे, पक्षांची किलबिल, पाणी तापवण्यासाठी पेटवल्या चुलीच्या धुराचा वास, आमराईचा सुगंध, गाई म्हशी चरायला जाताना असं बरंच काही.

दोन तीन दिवस आमच्या घरी वस्ती केल्यानंतर आमची स्वारी प्रस्थान करायची मामाच्या गावी. कारण आमच्या गावी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असे.

मामाच्या गावी जाण्यासाठी आमच्या गावावरून सकाळी ६ ची एसटी आहे. पण इतक्या सकाळी उठून जाण्यापेक्षा आम्ही ९ वाजताच्या गाडीने मोंड या गावात जायचो. मोंड पासून मामाचं गाव रस्ता मार्गे लांब आहे पण मध्ये नदी असल्यामुळे होडीने पैलाडी (पलीकडे) जायचो.
माझ्या मामाचं गाव वानिवडे आणि इथं बारमाही वाहणारी नदी आहे, आमराई तसेच माडाच्या बाग आहेत.

मामाच्या गावी माझी आजी (आये), ३ मामा-मामी आणि त्यांची चिल्लर पार्टी आहेत. अगदी "झुक झुक अगिन-गाडी...." या गाण्यातील शब्दानं प्रमाणे माझ्या मामाचा वाडा चिरेबंदी आहे. समोर मोठं अंगण (खळ), आजूबाजूला आमराई, माडाची झाड आणि त्यावर किलबिल करणारे पक्षी. आजही मी या गोष्टी अनुभवण्यासाठी तेवढाच उत्सुक असतो.

घरात खूप भावंड पण माझ्या मोठ्या मामाचा मुलगा निलेश हा माझ्या समवयस्क असल्याने त्याची आणि माझी मस्त बनायची. मामासोबत आंबे काढायला जाणे, नदी वर आंघोळ करणे, फिरायला जाणे, आणि ट्रकात बसून लग्नाला इत्यादी गोष्टी आम्ही एकत्र करायचो.
मला सायकल चालवायला पण त्यानेच शिकवली.
फोफळीच्या झावळी वापरून गाडी बनवणे आणि त्यावर बसून एकमेकांना ओढणे
दुपारच्या वेळेत कुरल्या (खेकडे), चिंगळ (झिंगा) पकडायला जाणे. सायकल वरून डबलसीट फिरणे हे आमचे उद्योग चालू असायचे.

मोकळ्या वेळात आंब्याच्या पेट्यांच्या फळ्या काढून त्याचा ट्रक बनवणे आणि त्यातून माल वाहतूक करणे मला खूप आवडायचं.

संध्याकाळच्या वेळेत आम्ही सगळे सड्यावर पावणाई देवीच्या दर्शनाला जायचो. सडा चढत असताना थकायला व्हायचं. पण सड्यावरून दिसणार निसर्ग सौदंर्य पाहताच मन कस भरून यायचं. देवीच दर्शन घेतल्या नंतर सगळा थकवा कसा निघून जायचा. मग परतीच्या वाटेवर असताना चांदवडच्या पानात कोकणचा रानमेवा जमा करायला आमच्यात स्पर्धा लागे. करवंद, चाराभोरा (चारोळ्या), काजू, फणस, आंबे जमा करून आपल्या सोबत गोळा करून घेऊन यायचो आणि मग एकत्र मिळून त्यावर ताव मारायचा, खरच खूप विलक्षनिय अनुभव आहेत.

खरी मज्जा तर तेव्हा यायची जेव्हा आम्ही सगळे भाचे-भाची एकत्र यायचो. खूपच मज्जा धमाल व्हायची.

घरच्या म्हशी असल्याने घरात दुधाला कमी नव्हती.
त्याशिवाय मामींनी बनवलेले घावणे, आंबोळ्या, शेवया, मोदक, लाडू, आंब्याचा रायता खाऊन पोट कस मस्त भरायचं.

कधी कधी संध्याकाळच बांदावर किंवा शाळेजवळच्या रस्त्यावर फेरफटका मारणे, नदी जवळ किंवा मळ्यात खेळायला जाणे. आणि काळोख पडायच्या अगोदर घरात येणे. घरी आल्यानंतर खळ्यात बसून मामाने सांगितलेल्या भुताच्या पण खऱ्या गोष्टी ऐकायच्या.

हळू हळू सुट्टी संपायची, परत मुंबईला यायची वेळ व्हायची, आणि मनावर दगड ठेऊन गावावरून कोकणचा रानमेवा आणि भेटी घेऊन मुंबईला परत यायचो...

हे सगळं मी तसेच माझ्या सारख्या कित्येकांनी अनुभवलंय कारण तेव्हा आमच्या हातात मोबाईल नावच उपकरण नव्हतं त्यामुळे आमच्या उन्हाळी सुट्ट्या निसर्गाच्या सानिध्यात घालवल्या जायच्या. पण हल्लीची मुलं सुट्टीच्या दिवसात दिवसभर मोबाईल, संगणक आणि क्लास यात इतके गुंतले आहेत की त्यांना मैदानात यायला पण वेळ नसतो.

माझी सगळ्या पालकांना विनंती आहेकी आपल्या मुलांना  यंत्रांमध्ये गुंतवून यंत्रमानव करण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सानिध्यात आपल्या गावी नेऊन खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवा.
कारण आमच्या वेळेपर्यंत सुट्टीच्या दिवशी मुलं मैदानातच दिसायची पण आज मैदान रिकामी आणि मुलं वायफाय च्या सानिध्यात बसलेली दिसतात.

पूर्ण वाचल्याबद्दल आपला खूप आभारी आहे.
ॐकार एकनाथ सुहासिनी वारीक (SCIENTIST)

Sunday, 7 May 2017

देवगड_हापूस_आंबा_महोत्सव

#देवगड_हापूस_आंबा_महोत्सव

सिंधुदुर्गचे आमदार नितेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील ग्राहकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी दिनांक ६ मे २०१७ ते ८ मे २०१७ पर्यंत दामोदर नाट्यगृह, परेल, मुंबई येथे आयोजित केलेल्या #देवगड_हापूस_आंबा_महोत्सवाला आज भेट दिली.

महोत्सवाच्या पटांगणात प्रवेश करताच क्षणी देवगडच्या हापूस आंब्याच्या दरवळणाऱ्या सुवासाने मन कसे प्रफ्फुलीत होते.

सदर महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, गिर्ये, नाडण, वानिवडे, लिंगडाळ, वाघोटण इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील अस्सल हापूस आंबे विक्रीस आणले आहेत.

अस्सल हापूस आंब्याची चव चाखायची असल्यास #देवगड_हापूस_आंबा_महोत्सवाला जरूर भेट द्या.

टीप :- उद्याचा दिवस हा महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.








https://m.facebook.com/story.php?story_fbid=1307426166039990&id=100003178586813


Saturday, 6 May 2017

ॐ मित्र मंडळ आयोजीत "घाटकोपर ते शिर्डी" यात्रा...

दिनांक ३ जून आणि ४ जून रोजी....
३ जून रोजी रात्री ८.०० वा अमृत नगर, घाटकोपर (प) येथून बस सुटतील.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????

मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ???? हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्...