मोदींनी दुखवलेली माणसे जास्त आहेत का सुखावलेली ????
हेच गणित 2019 मध्ये महत्वाचे ठरेल
मोदी हे एक सर्वसामान्य राजकारण्याहून वेगळेच व्यक्तिमत्त्व आहे. देशात मुलभूत बदल करायला निघाला हा अवलिया. नोटबंदी करून काहींची चांगलीच जिरविली . आधार व जनधन खाती काढून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर स्किमच्या माध्यमातून खूप लोकांचे चोरीचे धंदे बंद केले. मनरेगा इ योजनेतील मलई खाणाऱ्यांच्या पोटावरच पाय दिला. स्वच्छ भारत सारखे रिकामे उद्योग करून लोकांच्या शेकडो वर्षांच्या सवयी बदलण्याचा घाट घातला. देश-विदेशात फिरून भारताची इभ्रत व पत वाढविण्याचा जीवापाड प्रयत्न करतोय. भ्रष्टाचाराचे शेकडो मार्ग बंद केले. देशहिताचा पण काँग्रेसने १० वर्ष पेंडिंग ठेवलेला जीएसटी धाडसाने लागू केला. यूरियाच्या नीमकोटिंगमुळे कित्येकांच्या काळ्या धंद्यावर पाणी फिरविले. तीन तलाक विरोधी भूमिका घेऊन रूढीवादी मुस्लिमांची नाराजी ओढवून घेतली. गॅस, रेशनिंग इ. मधील भ्रष्टाचार रोखला. विदेश दौऱ्यावर पत्रकारांचा गोतावळा नेत नसल्याने ती मंडळी दात ओठ खाऊन आहेतच. परदेशी पैशावर भारतात कारस्थान करणाऱ्या एनजीओंवर अंकुश लावला. जीएसटीमुळे व्यापारी लोकांच्या बिन पावतीच्या काळ्या धंद्यावर लगाम बसला. ऑनलाइन सात-बारा, ड्रायव्हिंग लायलेन्स, पासपोर्ट इ मधील लाखो दलालांवर बराचसा पायबंद बसविला. कागदपत्रे स्वाक्षांकित करण्याच्या पद्धतीने अनेकांचा कुटिरोद्योग बंद झाला. सराफांवर टॅक्स लावून व आता वाढवून त्यांच्याही धंद्यांवर संक्रांत आणली. मुद्रा योजनेमुळे छोट्यामोठ्या उद्योगासाठी भांडवल देऊन रोजगारीची व्याख्याच बदलवून ती स्वयंरोजगार करून तरुणांची मानसिकता चाकरीऐवजी मालकीकडे वळवण्याचा प्रयत्न चालू आहे. स्टार्ट-अप इंडिया, स्टॅन्ड-अप इंडिया इ योजनांनी रोजगार मागणाऱ्यांना रोजगार देणारा बनविण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या परंपरागत मध्यमवर्गीय व छोटे व्यापारी या समर्थकांची पर्वा न करता गरीब व शेतकरी यांच्या हिताचा अर्थसंकल्प बनविला. जमेल तेवढ्या सर्व समाजघटकांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे ही सर्व भ्रष्ट टोळी सैरभैर झाली आहे. त्यांनी आता समाजात दुही माजविण्यासाठी जातीयवाद सुरू केला आहे. प्रत्येक छोट्यामोठ्या समाजघटकाची छोटीमोठी नाराजी शोधून काढून त्याला हवा देण्याचे प्रयत्न चालू आहे.
दुर्दैवाने ह्या नाराज घटकांचं मतदान कमी असले तरी ही मंडळी ओपिनिअन मेकर्स आहेत. समाजावर प्रभाव पाडणारी आहेत. यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कंपनीच्या कॅंटीनच्या पकौड्यात मीठ जास्त झाल्याबद्दल थेट कंपनीच्या चेअरमनची बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो काही प्रमाणात यशस्वी होतांनाही दिसतोय. कुठेही काही घडले, थोडीशी चुक झाली किंवा एखाद्या भाजपा नेत्याने काही भाषण केले तर मोदींना जबाबदार धरले जात आहे.
याचा परिणाम मोदींची ताकद कमी होणार आहे. कदाचित २०१९ ला सत्ता जाईल सुद्धा. हे मोदींनाही माहीत असेल. पण त्यांनी आपला मार्ग ढळू दिला नाही. त्यांना सर्वांना आवडणारा अर्थसंकल्प सहजपणे आणता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. सत्ता गेली तरी बेहत्तर, देशहिताच्या मार्गावरून ढळायचं नाही हा त्यांचा बाणा दिसतो. जनतेला स्वत: देशासाठी द्यायचे काहीच नाही, जमेल तेवढे फुकटात पदरात पाडून घ्यायचे आहे. तेही याला त्याला दिलेले नको, मलाच पाहिजे, ही प्रवृत्ती आहे. सर्व गोष्टी सरकारनेच केल्या पाहिजे, न केल्यास हे सरकार नालायक असा प्रचार केला जातो.
मित्रांनो, यातून काय घडेल? मोदींचा पराभव होईल. पुन्हा एकदा जुने कडबोळ्याचे सरकार येईल. मिल-बाॅंटकर-खाओ सुरू होईल. परत लक्षावधी कोटींचे भ्रष्टाचार सुरू होतील.
होऊ द्या. मला काय त्याचे असे म्हणत आपण सर्व मुकाटयाने बघत राहू नका. २०२४ ची वाट बघत राहू नका.
मी हे लिहिल्यामुळे मला भक्त म्हणून हिणवले जाईल, याची मला कल्पना आहे. पण मित्रांनो, मी देशहिताच्या दृष्टीने माझ्या भावना लिहिल्या आहेत. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. उगाच येथे भांडू नका.
टीप: फक्त शेअर करण्यापेक्षा कॉपी पेस्ट करा.